STORYMIRROR

Pandit Nimbalkar

Tragedy

4  

Pandit Nimbalkar

Tragedy

निर्भया

निर्भया

1 min
356

भय इथले संपत नाही 

देहाची लक्तरे होत आहे 

जीव मुठीत घेऊन मी 

मरण यातना भोगत आहे ||१||


नजरेचे वार नग्न झेलत 

नरकात मी रहाते आहे 

संधी साधू गर्दीत स्वतः 

तन,मनाने जळते आहे ||२||


मी फक्त भोग्य वस्तू 

नात्यातही बेअब्रू आहे 

सौंदर्य शोभेच्या गरजेची 

मौजेची फक्त लुट आहे ||३||


रक्ताळल्या गर्भात किती 

बाल वयातही विझती वाती

यौवनात अंगालाच झोंबती 

उतारवयाचीही तीच भीती ||४||


सैतान जगातला अंश  

तुच कारे माझा वंश आहे 

देह मादीचा कलंक भाळी 

रोज वासनांध दंश आहे  ||५||


बळी पडती निर्भया किती 

दावा कोठे अभय आहे 

दोषी मुक्त हिंडती नव्याने 

जळणारे सरण मात्र माझेच आहे ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy