STORYMIRROR

Gangadhar joshi

Tragedy

4  

Gangadhar joshi

Tragedy

निर्भया व अत्याचार

निर्भया व अत्याचार

1 min
471

न्याय मिळाला कोपर्डीला

न्याय मिळाला माता-पित्याला

मिळेल का हो परत जीवन

अत्याचारित त्या छकुलीला


न्यायदेवता जरी आंधळी

पकड प्रशासनाची लुळीपांगळी

दुष्कृत्याची मिळे झालर काळी

मिळेल का हो न्याय जगी ह्या

अत्याचारित पीडित छकुलीला


सज्जनांचा ओढून मुखवटा

कायद्याच्या बारा पळवाटा

किती साळसूद मोकाट जगी ह्या

मिळेल न्याय का त्या गत छकुलीना


किती नराधम तसेच सुटतील

किती राक्षस कळ्या तुडवतील

किती खटले तसेच चालतील

किती उज्वल वकील मिळतील

सुखाचे दिवस इथे मिळतील का बघायला


कलियुगाच्या काळ्या यादीत

मिळेल फाशी त्या सगळ्यांना

मिळेल का हो परत जीवन

माझ्या त्या गोड छकुलीना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy