निरभ्र आकाश
निरभ्र आकाश
माथ्यावरील अंबर
असती फार सुंदर
डोईवरी असे माझ्या
खूप छान समांतर ||१||
पक्ष्यांचा सुंदर थवा
करीतो कसा संचार
पाहता सौंदर्य त्यांचे
कसा वर्णू अलंकार ||२||
मोकळ्या आकाशी पाहे
जगण्याच्या दाही दिशा
प्रयत्नांची पराकाष्ठा
देईल उत्तम आशा ||३||
निळ्याभोर या आकाशी
नित्य उगवितो रवी
आगमनाने तयाच्या
मिळे आशा नवनवी ||४||
