STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Romance

3  

Prashant Tribhuwan

Romance

निरागस हास्य

निरागस हास्य

1 min
1.4K

अबोल नेहमी चेहरा

बोलता डोळे माझे ,

हरवून जातो पाहून

निरागस हास्य तुझे !


मी व्यक्त मनातच

तू मात्र बोलकी ,

वाटे मिळावी मज

तुझ्यावर मालकी !


साऱ्या चिंता मिटता

हसताना पाहिल्यावर ,

मन जाते माझे हर्षून

तुजसव राहिल्यावर !


हसल्यावर ती गोड

खळी जाते खोल ,

पाहून त्या खळीला

जातोय माझा तोल !


न कळावे तिला

माझ्या मनीचे बोल ,

म्हणून सदा राहतो 

स्वतःतच अबोल !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance