Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Inspirational

3  

Mrudula Raje

Inspirational

नीतिमूल्यांची प्रेरणा

नीतिमूल्यांची प्रेरणा

1 min
214


नीतिमत्तेचे प्रतीक आहे, आमची मराठी संस्कृती।

पालक देती प्रेरणा पाल्यांना, जपावयाला नीती॥


रोज सकाळी स्नानानंतर, नमस्कार देवाला।

तोच देतसे जीवन आम्हां, ही शिकवण मनाला॥


आई- वडील वंदनीय ते, नमन करावे देवानंतर।

देवासमान गुरूस मानती, पालक गुरुमध्ये ना अंतर॥


पालक देती प्रेरणा बालका, आदर्श मान गुरूचा।

तोच तेजाळतो ज्ञानदीप, हो उपासक नीतीचा॥


सायंकाळी देवापुढती, लावून सांजवात।

" शुभं करोती " मंत्र जपावा, येऊ द्या लक्ष्मी गृहात॥


रात्रीसमयी भोजनवेळी, जाणावे, " अन्न पूर्णब्रह्म "।

घास देई जो अन्नदाता, त्या म्हणावे, " सुखी भव "॥


शुभकृत्य जो करितो दिनभर, त्या न कशाचे भय।

अंगाई गीत गाते रजनी, दे आशिष बाळाला अक्षय॥


बाळ आजचा, नागरिक उद्याचा, सांभाळील ही नीती।

देती प्रेरणा , पालक पाल्याला; सांभाळण्या संस्कृती॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational