STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

3  

Pavan Pawar

Tragedy

नीती

नीती

1 min
144

आश्वासनाच्या राजाने मला कसे भ्रमीत केले

माझ्या हिताची गोष्ट सांगून माझे मत चोरून नेले,

मोठ मोठ्या योजनांनी माझ्या मनात जागा केली,

बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माझी जागा त्यानीच विकली

आश्वासनाच्या शब्दाचा होतो माझ्यावर भरमार,

माझ्या चुकिने घडते एक विकृत सरकार


लाखो रुपयाच्या आश्वासनाने मी भाराऊन गेलो,

विजबिलाच्या माफीसाठी त्यांच्याच मागे धावलो

खूप चिंता वाटते मला चढत्या बेरोजगाराची, 

खंत कशी व्यक्त करू वाढत्या बलात्कारांची

विटीच्या तावडीतून सुटलो आता खातो दगडाचा मार,

माझ्याच चुकिने घडते एक विकृत सरकार


मद्यराष्ट्राची निर्मीती बघून दुःख झाले भरपूर,

सोयाबिनने कंबर मोडली रडवायला आली तूर

पीकासाठी औषधासोबत खते वेळेवर नाही लाभली,

आमचीच पोरं तीरडीला हात लावायच्या कामाची राहील

डोळे बंद करूनी कसा चालवत आहेत कारभार,

माझ्याच चुकीने घडते एक विकृत सरकार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy