STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

नि:शब्द

नि:शब्द

1 min
11.7K

कोरोनाचा गाजावाजा झालाय साऱ्या जगभर 

वुहानपासून अमेरिकेपर्यंत पसरला भराभर


जगावर पसरलं या महामारीचं सावट

कसला हा विषाणू भलताच खवट


मोकळा श्वास घ्यायला वाटते आहे भीती 

कधी सांगावी या विषाणूची बदलेल मती


प्रत्येकजण झालाय जायबंदी चार भिंतीत 

घरात बसून फक्त फरक पडलाय कांतीत


सारी धावपळ रेलचेल स्वप्नवत वाटतेय

रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढतेय


नि:शब्द झालेत सारे फक्त नजराच त्यांच्या बोलतात

तोंडाच्या रूमालाआडून कैफियत आपली माडंतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy