STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

4  

Prashant Shinde

Abstract

नेत्र दान..!

नेत्र दान..!

1 min
485

नावात काय आहे

असे कोणीतरी म्हणून गेला

त्या नावसाठीच त्याचा

जन्म सरून गेला...


उरले फक्त नाव मागे

तो कोणीतरी म्हणुनी सांगण्याला

म्हणुनी आदर्श ठेवुनी त्याचा

वेळची मिळेना स्वतःसाठी खर्चण्याला....


धडपड सारी उगाच चाले

नाव मागे राखण्याला

कोणीच नाही उरतो पुन्हा

ते फिरुनी मागे पाहण्याला...


ती सोय मानवाने केली

दृष्टी शाबूत ठेवण्याची

नेत्रदान करुनी साधू संधी

पुन्हा आपलेच नाव पाहण्याची....


देह बदलूनी पाहूया पुन्हा

नाव आपले या जगात

अंधास दृष्टी देऊनी होऊया

कृथार्थ या जीवनात.......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract