STORYMIRROR

Ajay Nannar

Romance Fantasy

3  

Ajay Nannar

Romance Fantasy

नेहमी तू सोबत असताना

नेहमी तू सोबत असताना

1 min
151

नेहमी तू सोबत असताना

त्याचा माझ्यावर वर्षाव व्हावा

असा पाऊस मला हवाय


नेहमी जस ..तुझ्या प्रेमाने..

माझ्या मनातील दु:ख वाहून निघत

तसं..नद्यातून पाणी वाहून नेणारा

पाऊस मला हवाय


कधीच ..आकाशात अभ्र दाटून आलय

तसं..माझ मनही दाटलय


कधी या मनाच्या मेघाला

तुझ्या प्रेमाचा गारवा मिळेल

अन..कधी हा मेघ बरसेल


अरे.. कळू देत त्या मेघाला

अश्रू आवरेनासे झालेत


पड म्हणावं एकदाच

अन ..कर माझ्या अश्रूंना आपलंस

नाहीतर कळेल तिला

मी तिच्या विरहात रडल्याच..


क्षणभर सुद्धा तिच्याविना न राहणारा मी

तिच्याविना कसा राहतोय

ज्याला नेहमी पाऊस हवा असे

त्याच्या नयनातून पाऊस येतोय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance