नदी
नदी
सरीता मोठ्या मनाची
कुंचीत ना स्वभावाची
तप्त ऊन, थंड हिवाळा
फजिती करी पावसाळा
वाहे मनसोक्त महिने चार
काटेकुपाटे त्रासाने बेजार
बेडूक साप मासे संगोपन
जलचरांसाठी जीवनदान
नवखा ऋतूचा होतो पर्व
परोपकारी तरी नाही गर्व
पक्षी प्राण्यांचा मुक्त संचार
गावाच्या शिवाराला झालर
क्रियाकर्म मनुष्यांचे अंतिम
नदीकाठास असे अमरधाम
