नभ दाटले
नभ दाटले
नभ कसे हे दाटले
मेघ पहा गरजले
साजरा केला सोहळा
जग सारे बहरले ||१||
ढगांनी दिली सलामी
वर्षाव सरींचा झाला
पिसारा फुलवी मोर
अंगणी नाचू लागला ||२||
सप्तरंगी रांगोळीने
फुले इंद्रधनु नक्षी
झाडे वेली तरू पहा
आनंदाने न्हाती पक्षी ||३||
हिरवा शालू नेसुनी
वसुंधरा बहरली
गाणे गाती शिवार
सारी अवनी लाजली ||४||
वसुंधरेचा हर्ष पहा
आभाळ येती भेटीला
सुख समृद्धीचा लाभे
आशीर्वाद धरणीला ||५||
