नैराश्य
नैराश्य
नैराश्याच्या अंधकारात, बुडतो आहे थोडा थोडा.
एकटेपणाला सोबत आहे, भीतीचाच कोडा.
रेटायच म्हणून जगतोय, की जगायच म्हणून रेटतोय.
जागा स्वतःला बनवण्यासाठी, स्वतःलाच खेटतोय.
कधी तरी प्रयत्न म्हणून, अचानक पेटतोय.
शब्दांच्या दुनियेत, हळूहळू मन रमवतोय.
मूळ शोधन्यासाठी, अजून तळ गाठतोय.
असंख्य विचारांच्या जाळ्यात, अलगद अडकतोय.
क्षणभंगुर चांगल्या सारखे, वाईटही चाले जाईल.
पुन्हा नैराश्याच्या आठवणीत, तेच नैराश्य परत येईल.
सोडून सगळ नैराश्य, उपभोग सुखाचा घ्यायचाय.
किंमत कितीही असली, तरी एक लढा नक्की द्यायचाय.
