STORYMIRROR

Juili Gholap

Abstract Fantasy Others

3  

Juili Gholap

Abstract Fantasy Others

नाव तुझे

नाव तुझे

1 min
181

लिहीताना नाव तुझे पानावरती

हर्ष होतो लेखणीला माझ्या 


कळले जरी ना भाव तुला माझ्या मनाचे

कळतात सारे लेखणीला माझ्या 


भेटतो स्वप्नात रोज मला तू

आहे ओळख तुझी लेखणीला माझ्या 


राहते अबोल जरी तुजसमोर मी

फुटतो रोज कंठ लेखणीला माझ्या 


जरी मात्र तू एक वेडी कल्पना 

आहे वेड तुझे लेखणीला माझ्या 


दरवळतोस तू का असा माझ्या शब्दांमध्ये 

पडतो रोज प्रश्न लेखणीला माझ्या ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract