STORYMIRROR

Juili Gholap

Others

3  

Juili Gholap

Others

मन

मन

1 min
49

कधी असंच विचारांच्या मनात

अथांग सागर भरून येतो,

काही चांगल्या तर काही वाईट

पण अनेक लाटा सोबत घेऊन येतो !!


किनाऱ्यावर उभे असताना

एक लाट अशी येते

जाऊच नये परत ती

असे खुप वाटत असते !!


कितीही प्रयत्न केला

थांबवुन ठेवण्याचा

तरीही ती एक लाट असते

किनाऱ्यावर येते आणि

खुप काही घेऊन जाते !!


परतल्यावर अनेक लाटांमध्ये

ती कुठेतरी हरवून जाते

मागे उरते किनाऱ्यावर ते

एकटे मन ज्याला सोबत कुणीच नसते !!!!!


Rate this content
Log in