तू
तू
1 min
498
माझा सूर तू
माझी सांज तू
सागराची या गाज तू
बरसणाऱ्या या सरींच्या
थेंबा थेंबात आज तू
माझा श्वास तू
माझी आस तू
बहरणाऱ्या वेलीच्या
कुसूमातील गंध तू
पुन्हा उमलणाऱ्या माझ्या
कवितेतल्या प्रत्येक शब्दात तू
नाविन्याच्या दागिन्यातला
माझी मोतियाची माळ तू
अंगणात सांडलेल्या
प्राजक्ताच्या सङ्यात तू
कस सांगू तुला
माझ्यासाठी किती आहेस
खास तू......किती आहेस
खास तू......