पाऊस
पाऊस

1 min

66
कसा अल्लड बेभान
सवार होऊनी वाऱ्यावर
वर्षतो या धरणीवर
घेऊनी नवे जीवन....
भरे रंग नवे सृष्टीत
तृप्त करतो जीवांस
घेऊन येतो नेहमीच
नवचैतन्य जगात....
सप्तरंगाची उधळण
डोंगरांच्या पल्याङून
हिरवा शालू पांघरून
रजत किनार लेऊन....
नटली ही सृष्टी सारी
गायी सुखाची ही गाणी
रोमरोमात भरून
आनंद आणि उल्हास....
असा हा पाऊस लाडका
चला करू या साजरा
हर्षूनी सरींसवे
व्रत- कैवल्यांचा वसा....