STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

नाव जगभरडॉ .आंबेडकर

नाव जगभरडॉ .आंबेडकर

1 min
202

तेरा एप्रिल आठराशे एक्यान्नवला

म प्र तआंनद झाला महू गावाला

भिमाबाई रामजी यांना पुत्र झाला

भारताचे नाव उज्वल करण्याला


 दीनदलितांचा कैवारी असा भारी

 जगाला गोष्ट पटवून दिली खरी

 शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे

 जो ते पितो तो गुरगर तोच


प्रचंड पुस्तके ग्रंथसंग्रह घरात

शिक्षण झाले सातारा ,अमेरीकेत 

पहिला पदवीधर मान अपृश्यात

मिळून डॉक्टरेट पदवी केली प्राप्त


 केला संघर्ष चवदार तळ्यासाठी 

मंदिरे खुली केली अपृश्यांसाठी

राज्यघटना लिहीली भारतासाठी

आदर्शवादी ही घटना जगासाठी


स्विकार केला बोधी तत्वांचा

विश्वाला शांतीचा संदेश देण्याचा

निळा रंग विशालतेचा आकाशाचा

म्हणुन निळा रंग नित्य वापराचा


कायदेतज्ञ अन्य विषयात विद्वान

देशाने दिला भारतरत्न बहुमान

आपल्या उत्तुंग कार्याचे गुणगान

गात राहणार सर्वजन आनंदान


सहा डिसेंबर एकोणावीसशे छपन्न सालात

महापरिवान झाले नागपुरात

आपल्या कार्याची किर्ती जगात

जो पर्यंत चंद्र सूर्य आहे नभात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational