नात्यास नाव अपुल्या
नात्यास नाव अपुल्या

1 min

8.9K
नात्यास नाव अपुल्या
देणेची राहुनी गेले,
अव्यक्त भावना साऱ्या
सांगणेची राहुनी गेले,
काय करावे आता
काहीच सुचेनासे झाले,
तुझ्यात स्वतः ला शोधताना
सारेची हरवूनी बसले,
वळुनी मागे पहाता
सारेच स्वप्नवत वाटे,
डोळे उघडता आता
क्षणात सारे विरले,
तुजवाचून जगणे आता
अवघड दिव्य वाटे,
मनात सारे राहता
काही राहिलेसे भासे,
नात्यास नाव अपुल्या
देणेची राहुनी गेले,
काळाच्या प्रतिमा हसल्या
सांगणेही निरर्थक जाहले.