STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

3  

Varsha Shidore

Abstract

नातं काहीसं खास...

नातं काहीसं खास...

1 min
166

नको असतं भांडण...

पण कधी होतं सहज

कधी उगाच न पटणार

न सांगणं नाही जमत 


मन मोकळं नाही केलं 

तर ओझं वाटतं कुणाचं असणं

मग फुटतात कधी रागाचे फुगे 

पण योग्य तिथेच आपुलकीपायी


फुग्यातली हवा काही 

अशीच नसते रिकामी 

तिलाही असते जोड काळजीची

नि हक्क गाजवण्याची


नातं असं खास असतं

प्रेम तिथं जडत जातं

त्याचं काय असतं ना...

नात्यातलं हेच असतं खासपण !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract