नारंगी रंग
नारंगी रंग
पिवळा, लाल रंगाचे मिश्रण
तयार होतो नारंगी रंग
सूर्यास्ताचा अन सूर्योदयाचा
आहे हा ऐकमेकांचा संघ
नारंगी रंग दैवी शक्तीचे प्रतीक
आशा अन यशाचे प्रतीक
सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक
दुःखाच्या नशाचे ही प्रतीक
नारंगी रंग मनाला देई उत्साह
चमकदार , तेजसंग तारुण्य
दुःखाचे कारण शोधणारा
प्रतिष्ठित भावना निर्माण करणारा
नारंगी रंग दिसतास नजरेस
प्रफुल्लितपणा, चेहऱ्यावर येते तेज
बंधुभाव, एकोप्याची भावना
दर्शनी न दिसें कसलीही पैज
उत्कटतेला सकारात्मकतेशी जोडते
मनावर ही छाप पाडते...
आशेची, यशाची छबी दिसते
दुःखातूनही बाहेर काढते...
