नारीशक्ती
नारीशक्ती
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
गतकाळी ती जात्यावर गायची ओवी गाणी
नव्या युगात ती झाली सर्व क्षेत्राची राणी
उंच भरारी घेउन झाली ती वैमानिक कप्तान
विमान जहाज चालवण्याचा नाही वाटत तिला ताण
कधी चालवते ती बस रीक्षा
उभा जन्म कष्ट, नाही वाटत शिक्षा
कुणी ड्रायव्हर कुणी कंडक्टर
सिनेमातही ती झाली नटी ऍक्टर
क्षेत्र तिचे अमर्याद, नाही कोठे कमी
हसून घर सांभाळायचे तिचीच हमी
प्रगती करुन झाले तिचा महिमा महान
सैन्यदलात भरती झाली, अभिमानानं सांगते माझा देश महान
सर्व क्षेत्रात तिचा पुढाकार
प्रयत्नशील आहे ती, कामात नाही घेत माघार