STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Inspirational Others

3  

Mahananda Bagewadi

Inspirational Others

संकल्प करु नव वर्षाचे....!

संकल्प करु नव वर्षाचे....!

1 min
148

नववर्षाचे झाले आगमन

स्वागत त्याचे उत्सुकतेने करू

काही संकल्प यावर्षी धरु

 मनी दृढ निश्चय करु

 वर्ष सरते नेहमीप्रमाणे

 संकल्प सुरू पुन्हा नव्याने

 हेच घडे नित्यनियमाने

 संकल्प या वर्षी पुन्हा करू

 या करू संकल्प मानवतेचा 

नाही विसरणार धर्म स्वतःचा 

अन्यायाविरुद्ध फोडू वाचा

करा संकल्प हाच मनाचा

 संकल्प करू पुस्तक वाचण्याचा

 त्यावर थोडे चिंतन करण्याचा

 चांगल्या कर्माचे अर्पण ह्या जगाला

हाच संकल्प करु या नववर्षाला

 गोरगरिबांना हात देऊ

 दीनदुबळ्यांची मदत करू

 हा संकल्प न मोडण्याचा

 प्रथम हाच संकल्प करू 

हा संकल्प न मोडण्याचा

 प्रथम हाच संकल्प करू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational