STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

मकर संक्रात

मकर संक्रात

1 min
252


भारतीय अशा संस्कृतीत

महत्त्व संक्रांती सणाला

हळदी - कुंकू करूनी

वान देऊ सुहासणीला ||


मकर राशीत सूर्याचे

होते आजच संक्रमण

तिळगुळाचे गोड क्षण

असा संक्रांतीचा सण ||


लाडू तिळाचे पौष्टिक

संक्राती सणात स्थान

सुहासिनी करती आज 

वान भरून सुगड पूजन ||


तिळाची असे स्निग्धता

 गुळाचा गोडवा जीवनात

 पतंग घेतो गगन भरारी 

गोड गोड ओलावा शब्दात||


संक्रातीच्या दिनापासुनी

दिवस रात्र होती समसमान

ऋतूबदलाने थंडी कमी

मराठमोळा सण हा महान ||


जीवनात येणारे सर्व

नैराश्य, दुःख बदलूया

तिळगुळाच्या गोडव्याने

अनमोल नाती जपुया ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational