असंख्य अनाथांची आई
असंख्य अनाथांची आई
महाराष्ट्राची माई ही
अनाथांची आई झाली
सिंधूताई सपकाळ
धन्य ती माय माऊली !
संघर्ष जीवनी आला
मार्ग त्यातुन काढला
लढून यशस्वी झाल्या
सलाम त्यांच्या कार्याला !
जिवंत असताना तू
घडविला इतिहास
दहावीच्या पुस्तकात
अभ्यासात धडा खास !
पोरकी झाली बालके
अश्रू अनावर होती
थोर समाजसेविका
प्रणाम कोटी कोटी !