भाग मित्रा भाग
भाग मित्रा भाग
भाग मित्रा भाग,
आता खडबडून जाग
कारण गेलेली वेळ,
कधी परत येत नाही
केलेला संघर्ष कधी,
व्यर्थ जात नाही
दिसला का तो दीपस्तंभ?
खुणावतोय तुला
कितीही आलेले अडथळे तरी,
तिथं पोहोचायचं तुला
अडथळ्याविना का वेड्या,
कुणाचा असतो प्रवास
दरवळू दे कि जरा,
तुझ्या संघर्षाचा सुवास
कारण नको सांगू,
दिशा मिळत नाही मला..
पूर्वेलाच उगवाव,
हे कसं कळतं सूर्याला?
कारण नको सांगू,
आधार नाही मला
धरणीत काढून घेणाऱ्या,
आधार आहे का वृक्षाला?
कुणी निंदो, कुणी वंदो,
अपेक्षा नको करू
सातत्याचे प्रयत्न,
राहू दे कि सुरू
ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग,
जरी असला काटेरी
विश्वास ठेव श्रमावर,
परतीची पावलं, उमटतील सोनेरी
न्यूनगंडाच्या पाशातून,
सोडव एकदा स्वताला
दे हिसडा, अन सूट पळत,
ध्येय गाठायचंय तुला
एकदा विजयश्री खेचली की,
फन अन लिमिट
तुझ्यासाठी मित्रा मग,
स्काय इज द लिमिट
