अन त्रास झाला सटवीला
अन त्रास झाला सटवीला
अन त्रास झाला सटवीला,
रेखा भाळावरच्या पुसायला
उन्हातान्हात राबून जवा,
घट्टं पडलं हाताला
अन त्रास झाला सटवीला,
रेखा भाळावरच्या पुसायला
बराशी काढलेल्या हातात जवा,
पुस्तक दिसल सांजच्याला
त्रास झाला सटवीला,
रेखा भाळावरच्या पुसायला
मी बी हाट नाय सोडला,
लागलो जीव तोडून धावायला
त्रास झाला सटवीला,
रेखा भाळावरच्या पुसायला
