स्फूर्तीचा झरा
स्फूर्तीचा झरा
तु अजुन उडी मार,
पोहोचेल तुझा हात
स्फूर्तीचा अखंड झरा,
वाहिल ह्रदयात
मारताना उडी तु,
गाऊ नको दीन गाराणे
भगिरथ प्रयत्नाने तुझ्या,
आकाश होईल ठेंगणे
थोडी अजुन उडी मार,
पोहोचेल तुझा हात
काळोखभिन्न तिमिरात सुद्धा,
तारका देतील तुला साथ
जव पोहोचेल तुझा हात,
वरुन खाली डोकाव
सदैव सोबत असलेला
दिसेल तुझा गाव
घेता गगनासि भरारी,
पद असू दे भुइवरी
वंदनीय मायभू चे,
गाणे गा तु अंतरी
