नारी नशीब
नारी नशीब
कायदा झाला मोठा, परी हजारो त्या पळवाटा.
कित्येकी झाले अपराध, निराधारांचा काडतात काटा.
गाठले जाते स्त्रीला, एकट्यात त्या अंधारी.
मुठीत घेऊन पळते जिव, नाचवतात येथे मदारी.
कोन कसा घात करेल, काहीच कल्पना नाई.
प्रसंगी जिव गेला की, सगळ्यांना जाग येई.
पडे विसर नंतर, फक्त चर्चा कधीतरी.
तेवढ्या पुरता कांगावा, प्रश्न सुरक्षेचा अधांतरी.
आता जागे व्हा, आणी पेटून ऊठा पुन्हा.
अद्दल काही अशी घडवा, नंतर होनार नाही असा गुन्हा.
लढल्या शिवाय मान नाही, रणरागिणीच्या आयुष्याला.
आपणंच बंधने घालून, दोष देतो नारीच्या नशिबाला.
