नापिकी
नापिकी
नापिकीचे भयाण संकट उभे
धरतीवर ना आले हो पिके
अवजारे थकले करून कामे
पाण्याविना ना हो आली पिके
हिरवेगार शिवार हे आता स्वप्ने
मातीत हरवले आमचे सोने
पैसा पाण्यावानी हो लागतो
कर्जात बुडते मग जगणे
मेहनत हरते नापिकीची उभी संकटे
मौताज अन्नदाता ना मिळे कोरभर भाकर
डोळ्यासमोर उभे दिसे,कर्जाचे डोंगर
नापिकी शिवार,महागली भाकर
खाणारे घरात असे चार
कुणा कुणास देऊ हो मि घास
राज्य धोरणे हो बेकार
नाही उरे मग जगण्याची आस