STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance Tragedy

3  

SANJAY SALVI

Romance Tragedy

नाही तुला विसरले.

नाही तुला विसरले.

1 min
396

किती पावसाळे आले,

किती हिवाळे संपले,

किती ऋतू आले गेले,

नाही तुला विसरले,

 

किती दिवस सरले,

किती रात्री मी जागले,

किती काळ पलटले,

नाही तुला विसरले,

 

किती वसंत फुलले,

किती मोहर गंधले,

किती चांदणे शिंपिले,

नाही तुला विसरले,

 

पावसाच्या पाण्यात तू,

हिवाळ्याच्या थंडीत तू,

कशी तुला मी विसरू,

 

दिवसाच्या प्रकाशी तू,

रात्रीच्या अंधारी तू,

कशी तुला मी विसरू,

 

वसंताच्या फुलात तू,

फुलांच्या गंधात तू,

कशी तुला मी विसरू,

नाही तुला विसरले !!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance