STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

नाही कळला अण्णाभाऊ...

नाही कळला अण्णाभाऊ...

1 min
275

पिऊनच लागलेत सारे

नाचू आणि गाऊ,

कुणालाच नाही कळला

माझा अण्णा भाऊ.


कसं सांगू कुणाला

अण्णा भाऊ कोण होता,

लेखनी ज्यांची तलवार

तो असा योद्धा होता

त्यांच्या साहित्यावर लोक पी.एच.डी.लागले होऊ....।।


गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र

चलेजावचा लढा दिला,

हा स्वातंत्र्य सेनानी

देशासाठी तुरुंगात गेला

सगळेच पैलू त्यांचे किती उलगडून जगाला दावू...।।


कथा, कादंबऱ्या, नाट्य, पोवाडे,

गीतं, लावण्या, प्रवास वर्णन,

छक्कड, चित्रपट कथा

साहित्य खूप लिहिले अण्णानं

असा साहित्यीक, लोकशाहीर नाही शकणार होऊ...।।


काॅम्रेड, कामगार नेता

दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता,

अनुवाद साठे साहित्याचा

झाला आहे जगभर आता

गेले विमानात रशियात, पुतळे त्यांचे तेथे पाहू...।।


समाजाला नाही कळला

खूप समाजासाठी तळमळला,

विश्वास त्यांचा नाही ढळला

जीव त्यांचा आपल्यात घुटमळला

एकीने पुढे या सारे, नका लढायला आता कोणी भिऊ...।।


सतू भोसला आणि फकिरा

आदर्श त्यांचा घ्या जरा,

अन्यायावर वार करा

लहुजीचा हो वारस खरा

मांगाचा इतिहास खरा जगाला पुन्हा दाऊ...।।


एक होऊ सारे आपण

जपू लहूजी, अण्णाची शिकवण,

समाजाची ठेवून जान

जागवू स्वाभिमान

रक्तात फकिरा असू द्या बोला जय अण्णा, जय लहू...।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational