STORYMIRROR

Vijay Sanap

Drama

0.9  

Vijay Sanap

Drama

नागपंचमी

नागपंचमी

1 min
15.2K


पंचमी सणाला

पुजा नागाची करती

गाऊन आरती

नागोबाची ।।


खेळ पंचमीचे

चाले किती तरी

खुलतात सारी

मनोभावे ।।


नागपंचमीचा सण

येता माहेरची सय

वाटेवर माय

दिसतसे ।।


बंधुराया मुऱ्हाळी

मला पंचमी न्यायला

गाडी सोबतीला

घुंगराची ।।


पंचमी सणाला

झोका झाडाला बांधला

जाती खेळायाला

साऱ्याजणी ।।


नागपंचमी सणाला

हात मेंदीनं रंगला

खेळ मांडीयला

अंगणात ।।


नागोबाला पुजायाला

सख्या जाती वारुळाला

दुध नागोबाला

पाजती ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama