मुंगी उडाली आकाशी
मुंगी उडाली आकाशी
मुंगी उडाली आकाशी |
तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला |
वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय |
शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली |
देखोनी मुक्ताई हासली ||
मुंगी उडाली आकाशी |
तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला |
वांझे पुत्र प्रसवला ||
विंचु पाताळासी जाय |
शेष माथा वंदी पाय ||
माशी व्याली घार झाली |
देखोनी मुक्ताई हासली ||