Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

2  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

मुंगी साखरेचा रवा बालपण

मुंगी साखरेचा रवा बालपण

1 min
122


आज म्हणतो मुंगी साखरेचा रवा

बालपण मला आता देगा देवा |

बालपणी थोरामोठ्यांना पाहून का

केला कळेना उगाच त्यांचा हेवा | |१| |


बालपणीचा काळ खरच होता

किती तरी समाधान व सुखाचा |

भांडून एकत्र होतो नव्हता वैरभाव

दुरावा मनी नात्यात दु:खाचा | |२| |


शाळा,अभ्यास ,खानपान,खेळणं

झोपणं दिनक्रम असे तो एवढाच |

पालक नि सानथोरां कडून गोष्टी

ऐकण्यात वाटे रसही तेवढाच | |३| |


सुलभ निरागस होती बालपणीची

मैत्री अन् निर्विवाद होता लळा |

वाहता निर्झर अवखळ बालपण

हर्षाचा फुलवीतसे रम्य मळा | |४| |

 

नव्हते ओझे मनावर भविष्याचे ना

मानगुटीवर मूळी भूतकाळाचे भूत |

वर्तमानात होतो बिनधास्त उडवत 

आकाशात पतंग हाती धरून सूत | |५| |


भोवरा,चेंडू फळी,विट्टी दांडू चाले

बाहुल्यांचा भातुकलीचा खेळ |

रेडिओवरची ऐकत बडबडगीते

नव्हता कळत कुठे जायचा वेळ | |६| |


नव्हता दूरध्वनी,दुरदर्शन संगणक

होता वाचन लेखनास भरपूर वाव |

इन्स्टंट पदार्थ जरी नव्हते पौष्टिक

रानमेव्यावर मारीत होतो ताव | |७| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract