मुंबईचे गाराण
मुंबईचे गाराण
माझ्या मुंबईची तुंबई केली हो
माझ्या मुंबईची तुंबई केली हो।।ध्।।
दरवर्षी ची ज्वलंत समस्या बाई
कि-तेका चा संसार पाण्यात जाई
तळ हातावर पोट आहेत काही
इथे जिवाला किमत नाही.
माझ्या मुंबईची तुं ......।।१।।
आधी पूर्वी हे घडलचं नाही.
कामाशी प्रामाणिक उरले नाही.
खारफुटीवर बेकायदेशीर घर आहे.
पाण्याचा निचरा होण्यास जागा नाही.
माझ्या मुंबईची तुं.......।।२।।
बांधकामाचा उत आलाय भारी,
अधिकारी पैसे खाऊन एकमेकांस तारी.
माणसात माणूसकीच उरली नाही,
भष्ट्राचाऱ्याचीच ही दुनिया सारी.
माझ्या मुंबईची तुं.....।।३।।
भष्ट्राचाऱ्याची ज्वलंत समस्या उखडून काढा.
त्या अधिकाराना शोधून कायद्याने हाणा.
तोबा तोबा म्हणणाची वेळ त्यांच्या वर आणा.
भष्ष्ट्राचार रोखण्यास भक्कम कायदा आणा.
माझ्या मुंबईची तुं.......।।४।।
कायद्याचा हा धाक उरला नाही
भष्ट्राचा-यामुळे दुनिया डुबतेय सारी.
सर्व साधारण माणूस त्यात मरतोय काही.
ह्या पूराने जीव हैरान केलाय भारी.
माझ्या मुंबईची तुं ......।।५।।
ह्या मुंबईला अन देशाला वाचवा,
कुणी तरी सुंदर स्वप्न नगरी करून नटवा.
त्यात साऱ्या जनतेचा दोष कमी नाही,
देशासाठी अन स्वतःसाठी मशाल घेऊन प्रत्येकाला जागवा.
माझ्या मुंबईची तुंबई केली हो।।६।।
