STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Inspirational Children

3  

Rohit Khamkar

Romance Inspirational Children

मुलीच सुखं

मुलीच सुखं

1 min
337

इवल्या इवल्या पावलांनी आज, आलीस अशी घरी

आनंद गगनात मावेणा, भावना दाटल्या उरी


सारं मिळाल आता, उरली इच्छा नाही भारी

तूझ्या सोबती जगणे आयुष्य, हौस झाली सारी


एक टक तूझ बघणं, गालातल्या गालात हळूच हसणं

सारं काही जवळून पाहणं, कायम ते बाजूला बसणं


लोकांच्या मनात का असते, स्त्री भ्र्रूण सलगी

खर तर बापाला विचारा, काय असते मुलगी


जिच्या येण्याने सारं बदलते, नांदते दारी सुखं

सासर माहेर दोन्ही सांभाळते, आई बायको बहिण मुलगी मूख


आयुष्याला विचारा आयुष्य काय आहे, सारं काही उमजेल

मुलगी असण्याचं सुखं, फक्त बाप बनल्यावर समजेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance