STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Inspirational

4  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

मुलगी काळाची गरज#स्त्री शक्ती

मुलगी काळाची गरज#स्त्री शक्ती

1 min
318

पौराणिक काळापासुन स्त्रीयांमध्ये,

आदिशक्तीचा वास असण्याची जाण..

इतिहास घडविणाऱ्या स्त्रीयांचा वसा घेऊन,

सिध्द झालं ध्येय गाठण्याचं बळ आहे स्त्री शक्तीचं.. 


आत्मविश्वासाच्या बळावर मुुुली,

चढताना दिसतात आव्हानांचे शिखर..

अष्टपैलू हिऱ्यासारख्या भुमिका,

बजावताना जागर आहेे स्त्री शक्तीचंं..


"मुलगी शिकली प्रगती झाली" 

राबविले जात होते धोरण..

"देशाची मुलगी" म्हणत गौरवताना,

जगभर कौतुक आहे स्त्री शक्तीचं..


रूढी परंपरे नुसार मुलगा म्हणजे,

कुटुंब वारसी हक्काच्या वंशाचा दिवा..

नंदादीप लाऊन घर तेजोमय करणारी मुलगी,

साक्षात अन्नपूर्णा देवी उदाहरण आहे स्त्री शक्तीचं..


अनंत काळाची माता,

कलियुगात आवश्यकता आहे तिला सर्वस्व वाहण्याची..

मुलगी आहे काळाची गरज,

सर्वस्व बहाल करणारीला अखंड वरदान आहे स्त्री शक्तीचं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational