STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

मुक्त गझल...!

मुक्त गझल...!

1 min
791


मुक्त गझल......!


गझल ऐकता ऐकता

गझल मज उमजलीच नाही

जीवन गझल झाले

मज ते कळलेच नाही


शब्दांच्या पली कडे मी

कधी पाहिलेच नाही

शब्दांच्या अलीकडेही मज

काही दिसलेच नाही


कळले इतुके मजला

शब्दांचा हेवा करता करता

मीच होतो त्या संध्येला

एक गझल कर्ता


उरलो मीच माझ्या शब्दांपुरता

गझल सहजी करता करता....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational