मुखवटा (दिखावा)
मुखवटा (दिखावा)
नको करू रे माणसा,
खोटा कशाचा दिखावा,
जगी सारे सुखी असो,
हाच भाव मनी ठेवा.
असे माणुसकी ठायी,
त्यासी नसे कमी काही,
फुका अहंकार नको,
जरा सत्कर्माने राही.
खोटा करून दिखावा,
उगा वेळ जाई वाया,
खरे सौंदर्य मनाचे,
असे नाशवंत काया.
ढोंगी बनून कशाला,
करी सांग व्यभिचार,
जपा मोल जीवनाचे,
ठेवा मनी सदाचार.
खोट्या त्या प्रतिष्ठेपायी,
दु:ख नको देऊ कुणा,
करी प्रार्थना देवाला,
मिळो आनंद साऱ्यांना.
