मृत्यू..
मृत्यू..
प्रत्येकाचंच दार ठोठावतोय मृत्यू..
नको त्यांना हिरावून नेतोय मृत्यू
स्वप्नातल्या कळ्यां उमलू देत नाही मृत्यू
उरलीसुरली स्वप्ने पूर्ण करू देत नाही मृत्यू
जीवन भरभरून जगू देत नाही मृत्यु
अजून किती तरी सौंदर्य न्याहाळायचं आहे
अजून जगण्यावर शतदां प्रेम करायचं आहे
अजून कितीतरी संकल्प पूर्ण करायचे आहेत
मृत्यू तू यें पण आमच्यासाठी विकल्प म्हणून यें
आम्ही ठरवू तेव्हांच ये
तूझं विलगींकरण करता येतं
पण तुझं लाॅकडाऊन करता येत नाही.
