मृत्युपश्चात
मृत्युपश्चात
शीर्षक - मृत्युपश्चात
मृत्युपश्चातले जीवन
असते वेदनांनी मुक्त,
ना जगरहाटीची चिंता
भाव ही होतो विरक्त ॥१॥
जळता त्या अग्नीत
'प्राण' त्यागतो देह,
उरते काहीच नाही
होते माती निःसंदेह ॥२॥
श्वास होतात उसने
परकी होते ती काया,
अहंकाराची गळचेपी
नाही कामाची माया ॥३॥
पारलौकिकतेची वाट
चालू लागतो मानव,
कधी होते स्वर्गप्राप्ती
कधी होतो तो दानव ॥४॥
जगावे होऊनी परिमल
देण्या आनंद जगाला,
चार दिवसांनी माघारी
जावे लागेल प्रवासाला ॥५॥
