STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

मरणानंतर माझ्या...

मरणानंतर माझ्या...

1 min
206

मरणानंतर माझ्या नका करू डोळे ओले,

फक्त मला कळवा माझे कोण कोण आले


कोणी वाहिली पुष्पांची जुडी,

अन् कोणी नुसतीच काडी


कोणी वाहिली आदरांजली,

तर कोणाची पोहोचली श्रद्धांजली


जीवंत असताना ज्यांनी दिल्या मला शिव्या,

त्यांनीच गायल्या का माझ्या किर्तीच्या ओव्या


असा कसा हा आजचा जमाना सारा

मुॅह में राम और बगल में छुरा।


मरणानंतर माझ्या नका करू डोळे ओले,

फक्त मला कळवा माझे कोण कोण आले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy