मरगळ मनाची....!
मरगळ मनाची....!
मरगळ मनाची
जाता जात नाही
आवरत नाही
कधीतरी...!
कधी घेते
चादर ओढून अंधाराची
कधी उजेडाची
पांघरते...!
एकाकी असताना
कधी शांत बसते
द्विधा असते
मन:स्थिती...!
कधी स्वत:ला
विसरून सभोवती फिरते
अबोल्याशी जोडते
नाते...!
एकांताच्या सुईने
स्मृतींचे धागे गुंफते
आणि साकारते
वर्तमान...!
जेव्हा कधी
दु:खाच्या जाळीत अडकते
उणीवा शोधते
सुखाच्या...!
अनुभवी क्षणांनी
जाग यावी वास्तवाची
संपण्या मनाची
खळबळ...!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
