शीर्षक : स्वप्नफुले वेचताना...
शीर्षक : स्वप्नफुले वेचताना...
भावनांच्या कळ्या
अशा धुंद झाल्या
वेचताना नशिल्या
स्वप्नफुले...!
आज का
निशा अशी जागली?
धुक्यात नहाली
मुक्तपणे...!
स्पर्श सारे
जणू मुक्याने लपले
ओठ बैसले
मौनात...!
सप्तरंग सारेच
स्वप्नफुले अलवार वेचताना
नव्याने खुलताना
लुप्तले...!
चंद्रवेडा जळतो
प्रीत गीत गुंफताना
स्वप्नफुले वेचताना
सख्याचीच...!
प्रीत माझी
त्याला कशी कळेना
वाट दिसेना
अंतराची...!
शब्द काही
असे अधुरे उरताना
स्वप्नफुले वेचताना
राहतीच...!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
