STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

जरी रिती माझी झोळी...!

जरी रिती माझी झोळी...!

1 min
0


ठेव जपते स्वप्नांची

आशा दिसे नजरेत

जरी रिती माझी झोळी

मोल सुवर्णी मनात


नसे वैभवाची साथ

नाही नशिबात फळ

मनामध्ये साठवते

समाधान समतोल


वाट चुकली तरीही

नाही हरवून जात

विश्वासाच्या दीपानेच

मार्ग दिसे उजळत


रेषा कष्टांच्या कपाळी

घर्मसाज अनमोल

जरी रिती माझी झोळी

फिके श्रीमंतीचे मोल


नाही भीती कशाचीही

वाट अंधारी दिसते

नसे सावली कुणाची

धैर्य साठा वाढवते


एकाकीपणात माझ्या

असे जगण्याचे बोल

जरी रिती माझी झोळी

मनी श्रीमंती अमोल



         प्रज्ञाजी@Pg...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational