मृगजळ
मृगजळ

1 min

45
रक्ताची नाती सर्वश्रेष्ठ जरी असतात
परंतु त्यातील बरीचशी मृगजळ असतात
कधी कर्तव्य कधी आपुलकी जपतो
स्वतःपेक्षा त्यांना जवळचं मानतो
वेळ आल्यावर मात्र घाव तेच देतात
रक्ताची काही नाती मृगजळ असतात
समाजातील प्रतिमा जपण्यासाठी
जीवाचा आकांड तांडव करतात
प्रसंगी आपल्या माणसांचा बळी हे देतात
रक्ताची काही नाती मृगजळ असतात
प्रेमाच्या मृगजळत कित्येक आयुष्य उद्ध्वस्त होतात
त्यामागे धावताना स्वप्नही हवेत विरतात
नात्यांची गणितं तेव्हा समजतात
रक्ताची काही नाती मृगजळ असतात
नात्यांच्या मृगजळा मागे धावायचं नसतं
डोळे उघडे ठेवून आपण जीवन जगायचं असतं