STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

मरायचं न्हाय..

मरायचं न्हाय..

1 min
162

दिनरात राबतोय,उपाशीच मरतोय

जगतपोशिंदा, शेतकरी आत्महत्या करतोय,

त्यांनी नाही पिकवल तर,खायचे काय?

जगा रे बापांनो मरायच नाय.


असू दया गरीबी,लाचर तुम्ही नाही,

तुमच्या मुळीच दुनिया ही पोटभर खाई,

जन्म हा पुन्हा मिळणार नाय.

जगा रे बापांनो मरायच नाय.


नको भ्याड मरण तू शिक जगायला,

पुन्हा नाही मिळणार माणूस जन्म तुला,

मर्दासारख जग,आरे भितोस काय,

जगा रे बापांनो ,मरायच नाय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational