Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Inspirational

4.5  

Medha Desai

Inspirational

मराठी संस्कृती

मराठी संस्कृती

1 min
23.5K


जय जय महाराष्ट्र देशा, जगात तू भारी

साक्षरता, नि अठरापगड जातींचा तू कैवारी १


संतांच्या पदस्पर्शाने तुझी भूमी पावन झाली

गोदावरी, कृष्णा नद्यांनी पवित्रता आणली २


इतिहास लाभला आहे पेशव्यांचा, शिवबाचा

महान वारसा क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांचा ३


मराठी संस्कृतीची मातृभाषा मायबोली

शिक्षणाने सर्वांच्या मुखातून ती नावाजली ४


सह्याद्रीच्या कुशीत मराठी संस्कृती वसली

ऐतिहासिक भारी गडकिल्ल्यांनी भारावली ५


महाराष्ट्राची शान 'भारतरत्न लता मंगेशकर'

नि अभिमान क्रिकेटवीर 'सचिन तेंडुलकर' ६


राजधानी मुंबई सर्वांच्या ओढीची 'मायानगरी'

तरीही पोट भरण्यासाठी धावतात सारी ७


सर्व जिल्हे मराठीच्या बहिणींनी एकवटले

आमटे कुटुंबाच्या समाजसेवेने देवत्व आले ८


अष्टविनायकांच्या दर्शनाने भूमी पवित्र झाली

तीर्थक्षेत्रांनी तर आपली मराठी संस्कृती जपली ९


अशा दिमाखदार महाराष्ट्राची तेजस्वी शान

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जगात उंचावली मान १०


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational