STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

मराठी भाषा...

मराठी भाषा...

1 min
981


मराठीने फडकवले अटकेपार निशाण

माय मराठीच आहे जगाचा अभिमान

अशा मातृभाषेला ठेवावे आपण जपून


माझ्या मायबोलीची गोड, मधाळ वाणी

मराठी भाषा आहे महाराष्ट्राची राणी

दऱ्या-खोऱ्यात घुमते मराठी कहाणी


करू आपण मराठी भाषेला समृद्ध

तिला ठेवूयात अतिक्रमणांपासून शुद्ध

सांभाळू चिरतरूण ठेवा, ना होणार वृद्ध


ज्ञानेश्वर, रामदास आणि संत तुकाराम

पाडगांवकर, केशवसुत, पी. सावळाराम

यांनी गाजवले दशदिशांत आपले नाम


आजन्म करावे हो मातृभाषेचे संवर्धन

मायबोलीचे कराल तुम्ही नेहमी जतन

घ्या शपथ, द्यावे मजला सर्वांनी हे वचन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational