मोल स्वातंत्र्याचे
मोल स्वातंत्र्याचे
सारे मिळून
मोल स्वातंत्र्याचे
जपावयाचे
करू वंदन
अमर जवानांना
हुतात्म्यांना
अगाध कीर्ती
शूरवीर योध्द्यांची
स्मरावयाची
पवित्र भूमी
ही संत महात्म्यांची
गाथा गायची
फडकवू या
तिरंगा हा डौलाने
अभिमानाने
